शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण करा : ‘आयएमए’चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:54 IST

दरवर्षी महानगरपालिकेतर्फे इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण नर्सिंग होम कायद्यांतर्गत होत असते. यंदा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढण्यात व्यस्त आहे. यामुळे अनेक इस्पितळांचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे अशा इस्पितळांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवा परवाना द्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) पत्रपरिषदेतून करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मिशन ह्युमॅनिटी’उपक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी महानगरपालिकेतर्फे इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण नर्सिंग होम कायद्यांतर्गत होत असते. यंदा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढण्यात व्यस्त आहे. यामुळे अनेक इस्पितळांचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे अशा इस्पितळांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवा परवाना द्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) पत्रपरिषदेतून करण्यात आले. यावेळी आयएमएचे पॅट्रन अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या.डॉ. अढाव म्हणाले, कोविड-१९ हा नवा आजार असल्याने त्याचे स्वरुप अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे बदलत असतात. अशा वेळी जुन्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ देऊन डॉक्टरांना वेठीस धरण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. असे होऊ नये म्हणून शासनाने नव्या मार्गदर्शक सूचनांनंतर जुन्या सूचना रद्द झाल्या असेही नव्या सूचना काढताना नमूद करावे. शिवाय, डॉक्टरांना शासनातर्फे वारंवार नोटीस येतात. अशा वेळी आयएमएशी प्रशासनाने चर्चा करावी असेही आवाहनही त्यांनी केले. पत्रपरिषदेला डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. वंदना काटे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. आशिष दिसावल, डॉ. राफत खान, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. आलोक उमरे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. संजय देवतळे , डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. सचिन गाथे, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. गौरी अरोरा उपस्थित होते.१५हजार स्थलांतरित मजुरांची तपासणीअध्यक्ष डॉ. झुनझुनवाला म्हणाले, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘मिशन ह्युमॅनिटी’ उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल १५ हजार स्थलांतरित मजुरांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना ‘एन-९५’ मास्क, फेश शिल्ड व सॅनिटायजरचे वितरण केले. स्थलांतरीत महिलांना फिमेल युटिलिटी किट देण्यात आल्या. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकीनचा समावेश आहे.कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी टास्क फोर्सजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला आणि माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांच्या संदर्भात तसेच खासगी वैद्यकीय व्यवसायिक आणि शासनादरम्यान समन्वय साधला जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर