नागपुरातील सीताबर्डी मेन रोडवरील हॉकर्सना हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:36 IST2020-02-24T23:33:58+5:302020-02-24T23:36:22+5:30
सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण करून दुकाने लावणाऱ्या हॉकर्स विरोधात सोमवारी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

नागपुरातील सीताबर्डी मेन रोडवरील हॉकर्सना हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर : सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण करून दुकाने लावणाऱ्या हॉकर्स विरोधात सोमवारी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
मेन रोडवर दुकाने लावण्यासंदर्भात प्रकरण न्यायालयात असल्याने तीन दिवसापूर्वी व्यावसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागेचे मार्किग करून दिले होते. त्यानंतरही अनेक हॉकर्सनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने लावली होती. यामुळे फूटपाथ व रस्त्यांवरील रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. मेन रोड व फूटपाथ मोकळे करण्यासाठी वाहतूक विभागाचे एसीपी जयेश भंडारकर, प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, एपीआय सोनटक्के, महल्ले यांच्या नेतृत्वातील पथकाने ७० हॉकर्सवर कारवाई केली. विक्रे त्यांना मार्किं ग केलेल्या जागेबाहेर दुकाने लावल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मोदी नंबर ३ पर्यतच्या रस्त्यावर लावण्यात आलेली दुकाने हटविण्यात आली. कारवाईदरम्यान पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले.
मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हनुमाननगर झोन क्षेत्रातील तुकाडोजी पुतळा चौक ते सिद्धेश्वर सभागृह, मानेवाडा चौक ते उदयनगर, गजानन हायस्कूल ते सक्करदरा, छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा चौक दरम्यानच्या फूटपाथ व रस्त्यांवरील ४७ अतिक्रमणे हटविली.
मंगळवारी झोनच्या पथकाने छावणी चौक ते काटोल नाका चौक, पोलीस मुख्यालय ते गिट्टीखदान चौक, फ्रे न्डस् कॉलनी ते गोरेवाडा रिंग रोड दरम्यानच्या फूटपावरील अतिक्र मण हटविले. ही कारवाई महापालिकेच्या झोनच्या पथकाने केली.