रामटेक शहरातील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST2021-01-22T04:09:12+5:302021-01-22T04:09:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने गुरुवारी (दि. २१)पासून अतिक्रमण हटाव माेहीम राबवायला सुरुवात केली आहे. या ...

Removed encroachment in Ramtek city | रामटेक शहरातील अतिक्रमण काढले

रामटेक शहरातील अतिक्रमण काढले

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने गुरुवारी (दि. २१)पासून अतिक्रमण हटाव माेहीम राबवायला सुरुवात केली आहे. या माेहिमेंतर्गत पहिल्या दिवशी शहरातील महात्मा गांधी चाैक, सुपर मार्केट, पंडित नेहरू चाैक, शांतीनाथ मंदिर राेड, बसस्थानक चाैक यासह अन्य भागातील अतिक्रमण काढण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारवाईच्यावेळी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता.

शहरातील महत्त्वाच्या भागात काही नागरिकांनी राेडलगत वाहनतळ तयार करून माेठ्या प्रमाणात वाहने उभी करायला सुरुवात केली हाेती. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमाेर शेडची निर्मिती केली हाेती. त्यामुळे शहरातील राेड अरुंद हाेऊन वाहतूक काेंडी व्हायची. याच वाहतूक काेंडीतून वाहन चालविताना तसेच पायी चालताना त्रास हाेत असल्याने अपघाताची शक्यताही बळावली हाेती. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मागणीही काहींनी स्थानिक पालिका प्रशासनाकडे केली हाेती.

त्याअनुषंगाने पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेत अतिक्रमणधारकांना नाेटीस बजावून त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढण्याची सूचना केली. त्यासाठी त्यांना अवधीही देण्यात आला. हा अवधी संपल्यानंतर ज्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढली नाहीत, त्यांची अतिक्रमणे काढायला स्थानिक पालिका प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी शहरातील महात्मा गांधी चाैक, सुपर मार्केट, पंडित नेहरू चाैक, शांतीनाथ मंदिर राेड, बसस्थानक चाैक यासह अन्य भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. ही माेहीम पालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सव्वालाखे यांच्या नेतृत्वात राबविली जात असून, ठाणेदार मकेश्वर व पाेलीस उपनिरीक्षक शेंडे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

...

वाहनतळाची समस्या कायम

बहुतांश नागरिक त्यांची वाहने राेडलगत मिळेल तिथे उभी करतात. काही दुकानदार खाद्यपदार्थांची दुकाने व हातठेले राेडलगत थाटतात. त्यामुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, प्रसंगी भांडणेही हाेतात. अतिक्रमण हटविण्यात आल्याने हातठेलेवाले व छाेट्या दुकानदारांच्या उपजीविकेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या छाेट्या दुकानदारांना त्यांच्या दुकानांसाठी तसेच नागरिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा उपलघ करून देणे गरजेचे आहे. ही समस्या कायमस्वरुपी न साेडविल्यास ती पुन्हा गंभीर रूप धारण करण्याची शक्यता बळावली आहे.

...

शहराचे साैंदर्यीकरण आणि नागरिकांची साेय लक्षात घेता, ही माेहीम वर्षभर राबविली जाणार आहे. यात काही नागरिकांची गैरसाेय हाेणार आहे. नागरिकांनी अतिक्रमण न करता जागा रिकामी ठेवावी आणि या अतिक्रमण हटाव माेहिमेस पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील सुपर मार्केट परिसरात वाहनतळाची व्यवस्था केली जाईल.

- अर्चना वंजारी, मुख्याधिकारी,

नगरपरिषद रामटेक.

Web Title: Removed encroachment in Ramtek city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.