झाडांवर गुंतलेला १० किलाे मांजा काढला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST2021-02-14T04:07:50+5:302021-02-14T04:07:50+5:30
नागपूर : झाडांवर, विजेच्या तारांवर गुंतलेला नायलाॅन मांजा आताही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळाेवेळी हाेणाऱ्या अपघातांतून ही बाब दृष्टीस ...

झाडांवर गुंतलेला १० किलाे मांजा काढला ()
नागपूर : झाडांवर, विजेच्या तारांवर गुंतलेला नायलाॅन मांजा आताही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळाेवेळी हाेणाऱ्या अपघातांतून ही बाब दृष्टीस पडत आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी काही ध्येयवेड्या तरुणांची धडपड आताही चालली आहे. संक्रांतीनंतरही सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमातून या तरुणांनी झाडांवर किंवा तारांवर गुंतून राहिलेला १० किलाेवर मांजा काढून पक्ष्यांच्या सुरक्षित भ्रमणाचा मार्ग माेकळा केला.
संक्रांतीच्या काळात पतंग उडविण्यासाठी नायलाॅन मांजावर बॅन असूनही सर्रास विक्रीही झाली आणि वापरही झाला. त्याची प्रचिती आजही येते. झाडांवर, इमारतींवर किंवा विद्युततारांवर पक्षी अडकल्याची प्रकरणे आजही समाेर येतात. मात्र काही पक्षीप्रेमी आताही पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी सरसावले आहेत. ग्राेव्हील फाउंडेशन हा त्यातलाच तरुणांचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी संक्रांतीपूर्वी नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंधने घालण्यासाठी कार्य केले. मात्र संक्रांतीनंतर स्वस्थ न बसता सातत्याने अडकलेला नायलाॅन मांजा काढण्याची माेहीम राबविली. ग्रुपच्या २५-३० सक्रिय सदस्यांनी याेग्य प्रशिक्षणासह श्रमदान करून झाडांवर, इमारतींवर, विजेच्या तारांवर गुंतलेला मांजा काढला. १० किलाेवर मांजा काढून झाडे माेकळी केली.
या ग्रुपसाेबत अनेक संस्थांच्या सदस्यांनी, महाविद्यालयीन तरुणांनी माेहिमेत सहभाग घेतला. मॅट्रिक्स वाॅरियर्सच्या सदस्यांनी पाेलिसांच्या मदतीने मांजा विक्रेत्यांच्या गाेडाऊनमध्ये धाड घालून कारवाईस भाग पाडले. सर्पमित्रांच्या अनेक सदस्यांनीही सापांच्या सुरक्षेसाठी अडकलेला मांजा काढण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. रितिक कापरे, तृप्ती तायडे, अमित वंजारी, बंटी शर्मा, अशाेक प्रजापती, राजेश सबनीस, हर्षल गटकिने, नितीन मसिह, रेणुका गिरडे, पार्थ धाेंड, राहुल खापेकर, पंकज आसरे आदी अनेक सक्रिय सदस्य अभियानात सेवा देत असून पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यासाठी स्वाक्षरी माेहीम
दरवर्षी नायलाॅन मांजावर बंधने लावली जातात, पण ऐनवेळी कारवाई माेहीम राबविली जाते. व्यापारी आधीच मांजा आणून ठेवल्याचे कारण देत विक्रीसाठी तगादा लावत असतात. त्यामुळे संक्रांत आल्यानंतर वेळेवर कारवाईचा बडगा उभारण्यापेक्षा आतापासून कठाेर अंमलबजावणी करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे. यासाठी शहरातील उद्याने, तलाव परिसरात १५ स्वाक्षरी अभियान राबविली जाणार आहेत. त्यानंतर न्यायालयात हे निवेदन सादर केले जाणार असल्याचे डाॅ. अभिक घाेष यांनी सांगितले.