शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेतील घोळ दूर करा : भाजपची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:19 IST

मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व घोळ दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत आल्या होत्या अडचणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व घोळ दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. शिष्टमंडळामध्ये आमदार डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सुनील मित्रा, दिलीप गौर, मुकेश साधवानी तसेच सर्व प्रभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात मतदारांशी संबंधित अनेक तक्रारींबाबत अवगत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीदरम्यान एकाच कु टुंबातील सदस्यांचे वेगवेगळ्या बुथवर मतदान होते. नियमित असणारे केंद्र बदलविण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला. मतदारांचे मतदार केंद्र हे त्यांच्या निवासस्थानापासून एक-दोन किमीच्या अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी अनेक मतदारांचे केंद्र त्यांच्या घरापासून आठ ते दहा किलोमीटर दूर असल्याने मतदानाची टाळाटाळ झाल्याच्या तक्रारीही नागरिकांनी दिल्या होत्या. ही अडचण दूर करण्याची मागणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत असंख्य मतदारांचे विधानसभा क्षेत्रच बदलले होते. उत्तर नागपूरच्या मतदारांचे नाव पूर्व नागपूरमध्ये गेल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. ही बाब निवेदनात नमूद करण्यात आली. मृतांची नावे वगळण्यात यावी, मतदार यादी शुद्ध व्हावी आणि मतदारांच्या मतदान केंद्राची माहिती ८ दिवसांपूर्वी उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणीही भाजपने यावेळी केली.विशेष म्हणजे भाजपने यापूर्वीही मतदारांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यामध्ये नोंदणीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात यावा, ऑनलाईन अर्जात त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याकरिता बीएलओकडून कोणतीही विचारणा होत नाही. ऑनलाईन अर्जाची प्रिंट मिळण्याची मुभा नही. पोच पावतीची , ट्रॅक नंबरचे प्रिंट काढता येत नाही. ऑनलाईन अर्ज मंजूर होण्याचा कालावधी कमी करावा आणि जुने प्लास्टिक लॅमिनेटेड कार्ड हरवल्यास, खराब झाल्यास, न मिळाल्यास, नवीन कार्ड बनवून मिळण्याची मोठी यंत्रणा उभारण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयMLAआमदारBJPभाजपाElectionनिवडणूक