मिहान-सेझ येथील उद्योगांना दिलासा
By Admin | Updated: May 8, 2014 02:39 IST2014-05-08T02:39:14+5:302014-05-08T02:39:14+5:30
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मिहान-सेझमधील उद्योजकांना दिलासा दिला आहे.

मिहान-सेझ येथील उद्योगांना दिलासा
नागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मिहान-सेझमधील उद्योजकांना दिलासा दिला आहे. विजेची समस्या सोडविण्यासाठी येथील उद्योगांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. उद्योगाने विजेसाठी अर्जकेला किंवा नाही, ही बाब ग्राह्य न धरता सर्वांनाच महावितरणने वीज द्यावी, असे आयोगाने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
'ल्युपिन'ला वीज पुरवठा
ज्या उद्योगांनी महावितरणकडून वीज घेण्याचा पर्याय निवडला होता, त्यांना तत्काळ वीज मिळेल. मंगळवारच्या आदेशानंतर ल्युपिन कंपनीला बुधवारी वीज पुरवठा करण्यात आल्याची माहिती एमएडीसीच्या अधिकार्यांनी दिली. ज्यांना आधी पुरवठा व्हायचा, पण महावितरणकडे अर्ज केलेला नाही, त्यांनाही दोन दिवसात वीज उपलब्ध होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
आयोगाने आदेशात म्हटले आहे की, महावितरणकडून वीज घेण्याचा पर्याय निवडलेल्या उद्योगांना वीज देण्यासाठी महावितरणअभिजित समूह आणि एमएडीसीच्या पारेषण व वितरण नेटवर्कचा उपयोग करू शकतो. त्यासाठी त्यांना योग्य शुल्क द्यावे लागेल. स्थिती सुरळीत झाल्यानंतर अभिजित आणि एमएडीसी आयोगाकडे आपला पक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्रआहे.
वीजदर निश्चितीवर लवकरच समिती
एमएडीसी आणि अभिजित एनर्जी प्रा.लि.च्या वादात मिहान-सेझमधील उद्योगांना १७ एप्रिलपासून वीज पुरवठा बंद आहे. याआधी आयोगाने महावितरणला येथील उद्योगांना वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्या विरोधात मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने वीज नियामक आयोगाला ६ मेपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले होते. पुढे स्थिती सुरळीत झाल्यानंतर तांत्निक व व्यावसायिक समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्न समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात एमएडीसी, अभिजित समूह, महापारेषण व महावितरण यांचा एकेक सदस्य असावा, असे आयोगाने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)