रेमडेसिविर कोरोनासाठी प्रभावशाली नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:08 IST2021-04-21T04:08:39+5:302021-04-21T04:08:39+5:30

नागपूर : रेमडेसिविर हे कोरोनावर रामबाण औषध आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो. गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा ...

Remedesivir not effective for corona () | रेमडेसिविर कोरोनासाठी प्रभावशाली नाही ()

रेमडेसिविर कोरोनासाठी प्रभावशाली नाही ()

नागपूर : रेमडेसिविर हे कोरोनावर रामबाण औषध आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो. गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुप्फुसातील संसर्ग कमी करतो, हा जनतेमधील गैरसमज आहे. हे औषध कोरोनासाठी प्रभावशाली नसून, वैद्यकीय क्षेत्रात इतर औषधी याहीपेक्षा उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी रेमडेसिविर मिळत नाही म्हणून भयभीत होऊ नये, असे आवाहन सेवाग्राम (वर्धा) येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांनी केले आहे.

रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे दिवस कमी करणे तसेच फुप्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशोधनाअंती म्हटले आहे. जगातल्या २८ देशांमध्ये झालेल्या संशोधनातून जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा रेमडेसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाने या औषधाबद्दल समाजात गैरसमज पसरविला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडेसिविर मिळत नाही, म्हणजे आता मृत्यू अटळ आहे. हा भ्रम लोकांमध्ये तयार होणे भीतिदायक आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर रेमडेसिविर देण्यासाठी दबाव आणतात. रेमडेसिविरशिवाय इतर अनेक औषधीमुळे कोविड रुग्ण बरा होतो. सेवाग्राम रुग्णालयात अनेक वृद्ध रुग्णसुद्धा रेमडेसिविरचा उपयोग न करता पूर्णपणे बरे झाले, असेही डॉ. कलंत्री यांनी सांगितले आहे.

Web Title: Remedesivir not effective for corona ()