मेडिकलमध्ये आले रेमडेसिवीर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST2020-12-29T04:08:49+5:302020-12-29T04:08:49+5:30
मेयोमध्ये वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त नागपूर : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी रोज ३५० ते ४५० दरम्यान रुग्ण ...

मेडिकलमध्ये आले रेमडेसिवीर इंजेक्शन
मेयोमध्ये वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त
नागपूर : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी रोज ३५० ते ४५० दरम्यान रुग्ण दिसून येत आहेत. या रुग्णांचा सर्वाधिक भार मेयो, मेडिकलवर आहे. परंतु मेयोमधील वैद्यकीय अधीक्षक पद मागील दोन महिन्यापासून रिक्त आहे. विशेष म्हणजे, हे पद घेण्यास कुणी वरिष्ठ डॉक्टर इच्छुक नसल्याचे पुढे आले आहे.
गंभीर झालेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर
नागपूर : खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये गंभीर झालेल्या रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. परिणामी, २४ तासात उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालयातील मृत्यूची संख्या कमी ठेवण्यासाठी गंभीर रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात असल्याचे मेयो, मेडिकलमधील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.