शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

अर्थ गेले तरी विदर्भाला दिलासा; गृह, उर्जा, जलसंपदा फडणवीसांकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 11:05 IST

राठोडांना धक्का, धर्मरावबाबांना बळ

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याला कुटनीती म्हटले त्या राजकीय तडजोडीत त्यांच्याकडील अर्थ व नियोजन खाते नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले असले तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे गृहखाते तसेच विदर्भ विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ऊर्जा व जलसंपदा ही खाती फडणवीस यांच्याकडेच कायम राहिल्याने प्रदेशाला दिलासा लाभला आहे.

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित खातेवाटपात यवतमाळचे संजय राठोड यांना धक्का बसला असून ड्रगिस्ट व केमिस्ट असोसिएशनने केलेल्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर त्यांच्याकडील अन्न व औषधी मंत्रालय गडचिरोलीचेधर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सोपविले गेले आहे. सुधीर मुनगंटीवार या विदर्भातील चौथ्या मंत्र्यांकडील वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती कायम राहिल्याने त्यांच्या राजकीय वजनावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात अर्थखाते विदर्भाकडे होते. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी मिळून विदर्भाच्या हक्काचा निधी देण्यात हात सैल सोडला होता. त्यावेळी नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांनाच अतिरिक्त निधी दिला जात असल्याची टीकाही झाली. त्यानंतर अजित पवार यांच्या रूपानेमहाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा अतिरिक्त निधी मिळाला नव्हता. आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. 

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने अर्थ व नियोजन खातेही पुन्हा विदर्भाच्या वाट्याला आले. त्यामुळे विदर्भाला पुन्हा न्याय मिळू लागला. आता ते खाते अजित पवार यांच्याकडे गेले असले तरी त्यांचा फडणवीस यांच्याशी चांगला समन्वय असल्याने विदर्भाला अर्थपुरवठ्याचा झरा आटणार नाही, अशी आशा आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्याची अदलाबदली

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना फटका बसला. राठोड यांच्याकडील अन्न व औषधी प्रशासन खाते गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे प्रतिनिधित्व करणारे धर्मरावबाबा आत्राम यांना देण्यात आले आहे. राठोड यांच्याकडे आता मृद व जलसंधारण खाते उरले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rathodसंजय राठोडVidarbhaविदर्भ