शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींना दिलासा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:19 IST

Nagpur : सरकारच्या घोषणेच्या पूर्ततेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सौरभ ढोरे लोकमत न्यूज नेटवर्क काटोल : राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनही आटोपले. लाडक्या बहिणींना खात्यात डिसेंबरचा हप्ता येणे सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घोषणेप्रमाणे शतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारत आहे. महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशांची सरसकट कर्ज माफी करू अशी घोषणा करण्यात आली होती. तसे घोषणा पत्रसुद्धा भाजपच्या वतीने काढण्यात आले होते.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी कृती समितीचे महादेव नखाते, मनोज जवंजाळ, कृष्णा डफरे, प्रा. वीरेंद्र इंगळे, अंगात भैस्वार, स्वप्नील धोटे आदी शेकऱ्यांनी केली आहे. 

"राज्यात २००२ पासून आजपर्यंत तीनवेळा कर्जमाफी जाहीर करण्यात आल्या. यात कधी शेतीच्या आकारमानावर तर कधी किमान रक्कम ठरवून कर्जमाफी घोषणा करण्यात आली. मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकालेला नाही. विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मागील तीनही कर्ज माफीचा फायदा होऊ शकलेला नाही. अशात नव्याने स्थापन झालेल्या सरकार मतदार म्हणून बळीराजाने भरभरून मतदान करीत रेकॉर्ड तोडून सरकार दिले आहे. आता त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे." - कृष्णा डफरे, शेतकरी

"गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यात बँकेची हुशारी कारणीभूत आहे. काही शेतकऱ्यावर २००३ पासून कर्ज आहे. बँकेने पाहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली. याला पुनर्गठन असे नाव दिले. या हुशारीमुळेच शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीत बसलेला नाही. त्यामुळे आता तरी पुनर्गठन शब्द वगळून सरसकट अशी कर्ज माफी जाहीर करण्यात यावी." - महादेव नखाते शेतकरी कृती समिती

टॅग्स :Farmerशेतकरीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाfarmingशेतीnagpurनागपूर