रिलायन्स डिफेन्सला हवी १००० एकर जागा !
By Admin | Updated: August 18, 2015 03:42 IST2015-08-18T03:42:42+5:302015-08-18T03:42:42+5:30
केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा मार्ग खुला केल्यानंतर देशातील नामांकित कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रात

रिलायन्स डिफेन्सला हवी १००० एकर जागा !
नागपूर : केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा मार्ग खुला केल्यानंतर देशातील नामांकित कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रात उद्योग उभारणीची तयारी सुरू केली आहे. यातच देशातील रिलायन्स कंपनीने या उद्योगासाठी मिहानमध्ये १००० एकर जागेची मागणी केली असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केल्याची माहिती आहे.
मिहानमध्ये रिलायन्सने उद्योग सुरू करण्यासाठी राजकीय स्तरावर पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
याशिवाय स्विफ्ट एव्हिएशन या विदेशी कंपनीनेही हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी मिहानमध्ये जागेची पाहणी केली आहे. या कंपनीला २०० एकर जागा हवी आहे.
फार्मा कंपन्यांची मागणी
निर्यातीत दर्जाच्या फार्मास्यिुटिकल्स कंपन्यांनी मिहानकडे उद्योग सुरू करण्यासाठी जागेची मागणी केली आहे यातच मार्कसन फार्मा कंपनीने मिहानची पाहणी करून १० एकर जागा मागितली आहे.