सहा अल्पवयीन मुलांची सुटका
By Admin | Updated: December 16, 2015 03:08 IST2015-12-16T03:08:52+5:302015-12-16T03:08:52+5:30
कुठल्याही शासकीय परवानगी शिवाय परराज्यातील मुलांना दाखल करून घेणाऱ्या कामठीतील अनमोल होस्टेलमधून जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सहा मुलांची सुटका केली.

सहा अल्पवयीन मुलांची सुटका
नागपूर : कुठल्याही शासकीय परवानगी शिवाय परराज्यातील मुलांना दाखल करून घेणाऱ्या कामठीतील अनमोल होस्टेलमधून जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सहा मुलांची सुटका केली. छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथील रमेबाई नावाच्या महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलीला काही महिन्यापूर्वी या होस्टेलमध्ये आणले होते. मुलीला परत घेण्यासाठी महिला होस्टेलमध्ये आली असता, तिला मुलगी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने चाईल्ड लाईनकडे तक्रार केली. बाल कल्याण समितीने जिल्हा बाल सरक्षण अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या होस्टेलमधून सहा अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी कारवाई केल्यानंतर या होस्टेलमध्ये ४ महिन्यापासून ते ८ वर्ष वयोगटातील सहा बालक आढळली. ही सर्व बालके इतर राज्यातून आणण्यात आली होती.