सात जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:35+5:302021-03-09T04:10:35+5:30
कामठी : पाेलिसांनी शहरातील छावणी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये सात गुरांची सुटका केली. ती जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी आणली असल्याची माहिती ...

सात जनावरांची सुटका
कामठी : पाेलिसांनी शहरातील छावणी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये सात गुरांची सुटका केली. ती जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी आणली असल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली असून, त्यांची किंमत ७० हजार रुपये असल्याचे त्यांंनी सांगितले. ही कारवाई रविवारी (दि. ७) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना शहरातील छावणी परिसरात असलेल्या पाेस्ट ऑफिसच्या मागच्या भागात झुडपांना जनावरे बांधली असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या भागाची पाहणी केली. त्यांना सात जनावरे आढळून येताच, त्यांनी परिसरातील नागरिकांना चाैकशी केली. ती जनावरे कुणाच्या मालकीची नसल्याचे तसेच ती अज्ञात व्यक्तीने या भागात बांधून पळ काढल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. ती जनावरे कत्तलखाल्यात नेण्यासाठी आणली असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी ती ताब्यात घेऊन नागपूर येथील गाेरक्षणमध्ये पाठविण्यची व्यवस्था केली. त्या गुरांची एकूण किंमत ७० हजार रुपये असल्याचेही ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले. ही कारवाई सहायक फाैजदार तंगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, महेश कठाणे, पंकज मारसिगे, निशांत कांबळे, शशिशंकर हंबरडे यांच्या पथकाने केली.