१० जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST2021-08-18T04:12:38+5:302021-08-18T04:12:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांच्या पथकाने साेमवारी (दि. १६) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास कामठी शहरातील किशोरी बाबा दर्गा ...

Release of 10 animals | १० जनावरांची सुटका

१० जनावरांची सुटका

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : पाेलिसांच्या पथकाने साेमवारी (दि. १६) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास कामठी शहरातील किशोरी बाबा दर्गा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये १० जनावरांची सुटका केली. या गुरांची किमत ८० हजार रुपये असल्याचेही पाेलिसांनी सांगितले.

कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना शहरातील किशोरी बाबा दर्गा परिसरातून जनावरांना बांधून नेले जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना एक जण जनावरे हाकलत असल्याचा तसेच सर्व जनावरे दाेराने बांधलेले असल्याचे आढळून आले.

पाेलिसांना पाहताच त्याने अंधाराचा फायदा घेत गुरांना साेडून पळ काढला. पाेलिसांनी ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट हाेताच जप्त केली. त्या गुरांची एकूण किंमत ८० हजार रुपये असल्याचेही पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक फौजदार तंगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, अश्विन चहांदे, विवेक दोरसेटवार यांच्या पथकाने केली.

Web Title: Release of 10 animals