कोरोनाबाधितांच्या वाॅर्डात नातेवाइकांना प्रवेश नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:27+5:302021-04-30T04:11:27+5:30
कोविडच्या मागील साथीमध्ये कोविड वाॅर्डामध्ये रुग्णालय कर्मचा-यांव्यतिरिक्त इतरांना प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस प्रशासनानेदेखील कठोर निर्बंध लावले होते. ...

कोरोनाबाधितांच्या वाॅर्डात नातेवाइकांना प्रवेश नको
कोविडच्या मागील साथीमध्ये कोविड वाॅर्डामध्ये रुग्णालय कर्मचा-यांव्यतिरिक्त इतरांना प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस प्रशासनानेदेखील कठोर निर्बंध लावले होते. सद्य:स्थितीत कोविड वाॅर्डातून निघणारा माणून कोरोना कॅरिअर म्हणून समाजात वावरत आहे, त्यांच्या प्रवेशावर पोलिसांच्या सहकार्याने प्रतिबंध घालण्याची गरज आहे. कोविड वाॅर्डात बाधितांच्या नातेवाइकांना आत जाण्याची परवानगी देऊ नये. पोलिसांनी नागरिकांना बाहेर थांबवावे आणि जर कोणी जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
खाजगी कोविड उपचार केंद्राकडून शपथपत्र घ्या
ज्या हॉटेल व मंगल कार्यालयाला कोविड केअर सेंटरच्या रूपात मान्यता देण्यात आलेली आहे, त्या सर्वांकडून एक शपथपत्र घेऊन कोणत्या दरात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि कोणती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचा आराखडा तयार करून याबाबतचे एक शपथपत्र सर्व हॉटेल व मंगल कार्यालय यांच्याकडून घेण्यात यावे. कोविड सेंटरच्या दर्शनी भागात त्या रेटचा चार्ट लावून घेण्यात यावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.