राजे बख्त बुलंद शहांशी टिंबर असोसिएशनचे नाते ?
By Admin | Updated: May 22, 2015 02:49 IST2015-05-22T02:49:01+5:302015-05-22T02:49:01+5:30
नागपूर शहर बसविणारे गोंडराजे बख्त बुलंद शहा यांची पत्नी राणी बख्त बुलंद शहा आणि नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी ...

राजे बख्त बुलंद शहांशी टिंबर असोसिएशनचे नाते ?
नरेश डोंगरे नागपूर
नागपूर शहर बसविणारे गोंडराजे बख्त बुलंद शहा यांची पत्नी राणी बख्त बुलंद शहा आणि नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी किंवा कृष्णकृपा डेव्हलपर्सचे संचालक यांचे नातेसंबंध आहेत काय, त्याचा शोध गुन्हेशाखेचे अधिकारी घेत आहेत. असोसिएशनचे कार्यालय आणि पदाधिकाऱ्यांकडून गुन्हेशाखेने बुधवारी जप्त केलेल्या कागदपत्रात अनेक धक्कादायक नोंदी आढळल्या. ही जमीन राणी बख्त बुलंद शहा यांची असल्याचेही त्यातूनच उघड झाले. त्यामुळे ही आदिवासी लॅण्ड गैरआदिवासींनी (टिंबर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी, डेव्हलपर्सनी) कशी विकत घेतली, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी गुन्हेशाखेचे अधिकारी कामी लागले आहे. त्यामुळे केवळ टिंबर आणि डेव्हलपर्सचे पदाधिकारीच नव्हे तर तहसीलदार आणि रजिस्ट्रार कार्यालयातील अनेक आजी-माजी अधिकारीही अडचणीत येणार आहेत.
कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण तसे जुनेच आहे. अलीकडे झालेल्या काही वादग्रस्त घडामोडीमुळे त्याच्या वरिष्ठ स्तरावर तक्रारी झाल्या. त्यामुळे त्याचे गांभीर्य वाढले.