मांढळ आराेग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:13+5:302021-02-05T04:43:13+5:30
कुही : जिल्हा परिषद आराेग्य विभागांतर्गत मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्राला सन २०१९-२० चा जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला ...

मांढळ आराेग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार
कुही : जिल्हा परिषद आराेग्य विभागांतर्गत मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्राला सन २०१९-२० चा जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट आराेग्य सेवेबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने आराेग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
राज्य शासनाने या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्राची निवड केली आहे. ५० हजार रुपये राेख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय आराेग्य अधिकाऱ्यांचे एक पथक परीक्षणासाठी आले हाेते. यात आराेग्य केंद्रातील स्वच्छता, आंतर व बाह्यरुग्ण विभाग, केंद्रातील प्रसुतीगृह, लसीकरण, माता बाल संगाेपन केंद्र, वनराई, वृक्ष संगाेपन अशा निकषानुसार ८०.८ टक्के गुण प्राप्त करून कायाकल्प पुरस्कार प्राप्त करण्यात मांढळ आराेग्य केंद्र यशस्वी ठरले आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आराेग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू राहील, असे तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय निकम यांनी सांगितले. राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत गुणवत्ता आश्वासन कायाकल्प कार्यक्रम राबविला जाताे. या उपक्रमांतर्गत प्राथमिक आराेग्य केंद्राची देखभाल, स्वच्छता, जैविक व्यवस्थापन, जंतुसंसर्ग व्यवस्थापन, रुग्णालयाबाहेरील स्वच्छता आदी निकष पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतीला या पुरस्काराने गौरविले जाते. या सांघिक कार्यात आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना नागदेवे, डॉ. केतकी निर्मळ, डॉ. कीर्ती डागोर यांच्यासह सतीश आठोले, जया परातेकर, मनिषा सोरते, चंद्रकांत जौजाळ, सुदर्शन कोरळेकर, तृप्ती रानडे, बोन्द्रे, शंभरकर, मेश्राम आदी अधिकारी व आराेग्य कर्मचाऱ्यांचे याेगदान लाभले.