‘रिजेक्ट कोल’ ठरतेय डोकेदुखी
By Admin | Updated: May 14, 2014 00:50 IST2014-05-14T00:50:03+5:302014-05-14T00:50:03+5:30
खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गालगतच्या शेतांमध्ये काही कंत्राटदारांनी ‘रिजेक्ट कोल’ अर्थात टाकाऊ कोळशाच्या भुकटी(चुरी)चे मोठमोठे

‘रिजेक्ट कोल’ ठरतेय डोकेदुखी
अरुण महाजन - खापरखेडा खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गालगतच्या शेतांमध्ये काही कंत्राटदारांनी खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रात विजेच्या उत्पादनासाठी मोठय़ा प्रमाणात कोळसा वापरला जातो. यात जो कोळसा वापरण्यायोग्य नसतो या टाकाऊ कोळशाला या मार्गावर १0 वर्षांंपूर्वी नागरी वस्ती नव्हती. त्यामुळे या कोळशाचा कुणालाही फारसा त्रास होत नव्हता. मात्र, हल्ली या मार्गावर नागरी वस्ती वाढत चालली आहे. त्यामुळे या मार्गावरील मिलन चौक, जयभोलेनगर तसेच पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या वस्तीतील नागरिकांना या कोळशाच्या भुकटीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विविध गंभीर आजार जडण्याची शक्यताही वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे. हा कोळसा ज्या शेतांमध्ये साठविण्यात आला आहे, त्या शेतीची शासनदरबारी अकृषक शेती अशी नोंद नाही. त्यामुळे हा कोळसा या शेतींसोबत इतर शेतांमध्ये हवेद्वारे पसरत असल्याने या जमिनीची पोत खराब होण्याची शक्यता बळावली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी खापरखेडा वीज केंद्र प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत, सावनेर तहसील कार्यालय, प्रदूषण नियंत्रण विभाग व पोलीस विभागाला अनेकदा निवेदने दिली. मात्र, या सर्व विभागातील अधिकार्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाचे पथक दहेगाव(रंगारी)-खापरखेडा या मार्गाने नेहमी वीज केंद्राची पाहणी करण्यासाठी नियमित येते व परत जाते. या पथकातील सदस्यांच्या नजरेत हे कोळशाचे ढीग दिसतात. मात्र, कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. कारवाई होत नसल्याने या कंत्राटदारांचे मनोबल उंचावले आहे. परिणामी, या कंत्राटदारांचे संबंधित अधिकार्यांशी