शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By आनंद डेकाटे | Updated: February 13, 2026 20:28 IST

Nagpur : मिहान प्रकल्पाअंतर्गत खापरी (रे.) तेल्हारा, दहेगाव व कलकुही गावातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे ७८१ कोटी ५९ लाख रूपये एवढा निधी वाटप केलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान प्रकल्पाअंतर्गत खापरी (रे.) तेल्हारा, दहेगाव व कलकुही गावातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे ७८१ कोटी ५९ लाख रूपये एवढा निधी वाटप केलेला आहे. जितक्या अधिक प्रमाणात प्रकल्पग्रस्तांना न्याय देता येईल तो देण्याची भूमिका आपण घेतली. अनेकांना चांगल्या ठिकाणी प्लाटचे वाटप केले. लाभाच्या स्वरुपात निधी दिला. महसूल विभागामार्फत युद्ध पातळीवर ही सर्व प्रक्रिया पार पाडून पुनर्वसनाचे काम पुर्नत्वास आले आहे. या उपरही एखाद्या व्यक्तीला जर आपल्यावर अन्याय झाल्याची भावना असेल अथवा त्यांच्याकडे रीतसर आवश्यक ती कागदपत्रे असतील अशा लोकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबीर घेऊन एक महिण्यात सर्व विषय मार्गी लावण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुनर्वसन विभागाला दिले.

मिहान येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पुनर्वसन व इतर प्रलंबित विषयाबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन इटनकर, मिहानचे सल्लागार सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मलिक विराणी, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बाधित लोकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुनर्वसन भागात लोकांची श्रद्धास्थानाविषयी असलेली मागणी लक्षात घेऊन नियमाप्रमाणे मंदीर, विहार आदीबाबत निर्णय घेतला जाईल. यात अधिकाधिक तीन हजार चौ.फूट एवढी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना निर्देश दिले. पुनर्वसन भागात मिहानअंतर्गत नागरी सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला. ग्राम पंचायतीमार्फत या गावांतील पाणी पट्टीची रक्कम भरण्याबाबत जो बेजबाबदारपणा आहे त्याबद्दल ग्रामविस्तार अधिकारी व तेथील ग्रामसेवकाला त्यांनी खडे बोल सुनावले.

मिहानसाठी ३९९४ कोटींचा आराखडा

मिहान प्रकल्पांच्या भूसंपादन व पुनर्वसनासाठी ३,९९४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. यापैकी बहुतांश निधी मिळाला आहे व त्याचे पुनर्वसनाच्या कामासाठी वाटप झालेले आहे. उर्वरीत निधीपैकी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी शासनाने २४० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. १६० कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली असून पुढील आर्थिक वर्षासाठी ५९७ कोटी रुपयांची मागणीही नोंदविण्यात आली आहे. या निधीतून वाढीव मोबदला प्रकरणे, पुनर्वसन अनुदाने, भूसंपादन, पुनर्वसन भागात नागरी सुविधा आदी कामांवर भर दिला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mihan Project Rehabilitation Complete: Guardian Minister Chandrashekhar Bawankule

Web Summary : Rehabilitation under the Mihan project is complete, with ₹781.59 crore distributed to project-affected people. Minister Bawankule has instructed officials to resolve pending grievances within a month through special camps. Focus on providing civic amenities and addressing infrastructure needs in the rehabilitated areas is a priority.
टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर