शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

२,५५३ गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले; गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:39 IST

Nagpur : विभागीय आयुक्तांच्या बैठकीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपचखेडी : भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्यांतील काही गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली. या प्रकल्पाला ४२ वर्षे पूर्ण झाली असून, या काळात काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, २,५५३ गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही रखडले आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नागपूर शहरात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी (दि. २९) बैठक बोलावली असून, या बैठकीतील निर्णयाकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

या प्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्यातील ५१, भंडारा ३४ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील  दोन अशी एकूण ८७ गावांमधील १५,१९१ कुटुंबे प्रभावित झाली. यातील १२,६३८ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले असून, २,५५३ कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप व्हायचे आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पवनी (जिल्हा भंडारा) तालुक्यातील नेरला येथील १,२३६ व खापरी (रेहपाडे) येथील ४७८, कुही (जिल्हा नागपूर) तालुक्यातील रुयाड (टेकेपार) येथील १३२, चंद्रपूर जिल्ह्यातील सायमारा (चक) व सावंगी (दीक्षित) या दोन गावांमधील २०७ अशा एकूण २,५५३ कुटुंबाचे पुनर्वसन रखडले असल्याचे प्रशासनाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे.

ही समस्या सोडविण्यास दिरंगाई होत असल्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यात प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करून ते राज्य सरकारकडे पाठविले जाईल, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. या समस्येवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा व तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी जीवनापूर, ता. कुही येथील प्रकल्पग्रस्त उमाजी शिवरकर यांनी केली आहे. 

किंमत ७० पटींनी वाढलीगोसेखुर्द प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. २२ मे २०२५ च्या प्रशासकीय मान्यतेनुसार ही किंमत २५,९७२.६९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४२ गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शासन व प्रशासन पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एजाज अली सय्यद यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर