ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:09+5:302021-04-09T04:08:09+5:30

नागपूर : राज्यात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता दस्तनोंदणीसाठी ऑनलाईन सेवांचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ...

Registration online at the Secondary Registrar's Office in rural areas | ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी ऑनलाईन

ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी ऑनलाईन

नागपूर : राज्यात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता दस्तनोंदणीसाठी ऑनलाईन सेवांचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी केले आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी दस्तनोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी न करता ऑनलाईन सेवांचा अंगिकार करण्याचा नागरिकांनी प्रयत्न करावा. नागपूर जिल्ह्यात १२ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. त्या कार्यालयातदेखील दस्तनोंदणीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध राहतील.

कार्यालयातील डेटा एन्ट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरिकांनी या विभागाच्या वेबसाईटवर असलेल्या दस्तनोंदणी करीता पीडीईद्वारे डाटा एन्ट्री करणे अनिवार्य आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील सोईची वेळ ऑनलाईन बुक करून कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करावी. जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल. ऑनलाईन वेळ आगाऊ बुक नसल्यास दस्तनोंदणी होणार नाही.

विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह ॲड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी पुढील आदेशापर्यत थांबविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरात व इतर ठिकाणी सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरू होती. त्याऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहतील. तथापि, यापूर्वी ‍दस्तनोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरू होते. त्यांचे कामकाज शनिवार, रविवारी बंद करण्यात येत आहे. आता फक्त सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित कामकाज सुरू राहील. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या परिस्थितीत ऑनलाईन सेवांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर ग्रामीण अ.प्र. हांडा यांनी केले आहे.

Web Title: Registration online at the Secondary Registrar's Office in rural areas