नवमतदारांत नोंदणीची क्रेझ
By Admin | Updated: September 19, 2014 00:52 IST2014-09-19T00:52:06+5:302014-09-19T00:52:06+5:30
१ आॅगस्ट ते १७ सप्टेबर या ४८ दिवसात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत सरासरी ३५ हजार अर्ज निवडणूक शाखेला प्राप्त झाले असून त्यात २० ते २२ हजारावर अर्ज नवमतदारांचे असल्याची माहिती आहे.

नवमतदारांत नोंदणीची क्रेझ
विशेष नोंदणी मोहीम : ३५ हजार अर्ज आले
नागपूर : १ आॅगस्ट ते १७ सप्टेबर या ४८ दिवसात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत सरासरी ३५ हजार अर्ज निवडणूक शाखेला प्राप्त झाले असून त्यात २० ते २२ हजारावर अर्ज नवमतदारांचे असल्याची माहिती आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुूसार १ आॅगस्ट ते १७ सप्टेबर या दरम्यान मतदार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू होते. सर्व केंद्रावरून अर्ज स्वीकारण्यात येत होते. बुधवारी मोहिमेचा शेवटचा दिवस होता.
या दिवशी सर्वच केंद्रावर गर्दी होती. आता जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची गोळाबेरीज करण्याची प्रक्रिया निवडणूक शाखेत सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४८ दिवसात आलेल्या अर्जांची संख्या सरासरी ३३ ते ३५ हजार या दरम्यान असून यात २० ते २२ हजार अर्ज हे यादीत प्रथमच नाव नोंदवणाऱ्या तरुणाईचे आहेत. या संपूर्ण अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यातील पात्र अर्ज स्वीकारल्या जातील.२० तारखेला निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर वाढीव मतांचा नेमका आकडा कळू शकेल.
मतदार नोंदणी आणि मतदान करणे या बाबत जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीपासून आयोगाने सुरू केलेल्या प्रयत्नाला लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी अधिक प्रतिसाद मिळाल्याचे नोंदणीच्या संख्येवरून दिसून येते. विशेष म्हणजे तरुणार्इंचा सहभाग उल्लेखनीय आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.त्यासाठी एक वेगळ्या निरीक्षकाची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)