शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांसाठी १ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:13 IST

शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ विद्यार्थ्यांचा समावेश : लॉकडाऊन उघडताच सुरू होणार पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उघडताच तालुकास्तरावर पुस्तकांचा पुरवठा होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.केंद्र शासनाच्या ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटला भेट देऊन पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्र्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. तालुकास्तरावरून ऑनलाईन पद्धतीने वर्ष २०१८-१९ च्या युडायसनुसार वर्ग, विषय, विद्यार्थीनिहाय नोंदणी करण्यात आली. शाळा भरलेल्या ‘यूडीआयएसई’ डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ८९,३७० विद्यार्थी, सहावी ते आठवीपर्यंत ७०,३११ अशा एकूण १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. जि.प. माध्यमिक शिक्षण विभाग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून ब्लॉकस्तरावर ही पुस्तके रवाना होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही.विशेष म्हणजे, राज्य स्तरावरून बालभारतीकडे पुस्तके तयार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच राज्य स्तरावरूनच पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक वगळता इतर सर्व वाहतुकींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. लॉकडाऊन संपुष्टात येताच पुरवठाधाराकडून तालुकास्तरावर पुस्तके पोहचविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जेव्हाही शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होतील, याचेही नियोजन जि.प.च्या शिक्षण विभागाने केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर