तूर विक्रीसाठी नाेंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:31+5:302021-01-03T04:11:31+5:30

कळमेश्वर : शहरात तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्रावर किमान आधारभूत किमतीप्रमाणे तुरीची खरेदी केली जाणार ...

Register for sale of tires | तूर विक्रीसाठी नाेंदणी करा

तूर विक्रीसाठी नाेंदणी करा

कळमेश्वर : शहरात तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्रावर किमान आधारभूत किमतीप्रमाणे तुरीची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुरीची विक्री करण्यासाठी नाेंदणी करावी, असे आवाहन कळमेश्वर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबा काेढे यांनी केले आहे.

शासनाने तुरीची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल सहा हजार रुपये जाहीर केली आहे. कळमेश्वर येथील तूर खरेदी केंद्र कळमेश्वर तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री संघातर्फे व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या निर्देशानुसार सुरू करण्यात येणार आहे. तूर विक्रीसाठी ऑनलाईन नाेंदणी प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचा सात-बारा, आधारकार्ड क्रमांक, बॅंक पासबुक झेराॅक्स व माेबाईल क्रमांक खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन बाबा काेढे यांनी केले आहे.

Web Title: Register for sale of tires