मुलीला गर्भवती बनवून लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:07 IST2021-04-26T04:07:13+5:302021-04-26T04:07:13+5:30

पीडितेची तक्रार : जरीपटक्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षांच्या आरोपीने समवयस्क मुलीसोबत ...

Refuse marriage by making the girl pregnant | मुलीला गर्भवती बनवून लग्नास नकार

मुलीला गर्भवती बनवून लग्नास नकार

पीडितेची तक्रार : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षांच्या आरोपीने समवयस्क मुलीसोबत वारंवार शरीरसंबंध जोडले. ती गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. दरम्यान, मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

आरोपी जरीपटक्यात चायनीजचा ठेला चालवतो. येथे चायनीज खायला येणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीवर त्याने वर्षभरापूर्वी प्रेमजाळे फेकले. त्यात ती अडकल्यानंतर या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. लग्नाचे आमिष दाखवून तो तिला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला. १५ डिसेंबर २०२० ला सायंकाळी घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्याशी शरीरसंबंध जोडले. त्यानंतर तो तिला वारंवार आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. सततच्या शरीरसंबंधामुळे मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिने आरोपीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. दरम्यान, आरोपीच्या आईला ही बाब समजल्यावर तिने या लग्नाला जोरदार विरोध केला. त्यानंतर आरोपीनेही लग्नास नकार देऊन गर्भवती प्रेयसीला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नसल्याचे पाहून पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांसोबत शनिवारी जरीपटका ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी मुलीची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला पोलीस अटक करू शकले नाहीत. सूचनापत्र देऊन त्याला सोडण्यात आले.

---

मुलीचे भविष्य अंधारात

या प्रकारामुळे पीडित मुलीचे भवितव्य अंधारात आले आहे. तिच्या घरची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. त्यामुळे मुलीचे आणि तिच्या पोटातील गर्भाचे कसे होणार, असा प्रश्न तिच्या पालकांना पडला आहे.

---

Web Title: Refuse marriage by making the girl pregnant