शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:12 IST2021-05-05T04:12:32+5:302021-05-05T04:12:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापूर्वी ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र तो लग्नास ...

Refuse marriage by establishing sexual relations | शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापूर्वी ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र तो लग्नास नकार देत असल्यामुळे तरुणीने गणेशपेठ पोलिसांकडे बलात्काराची तक्रार नोंदवली.

अविनाश दोडीराम भिमटे (वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पारशिवणीचा रहिवासी असून सध्या वानाडोंगरी परिसरात राहतो.

बलात्काराचा आरोप करणारी तरुणी (वय २४) आणि आरोपी भिमटे या दोघांची सना नामक एक कॉमन फ्रेंड आहे. तिच्या माध्यमातून गेल्या वर्षी भिमटे आणि तरुणीची ओळख झाली. जवळीक वाढल्यानंतर त्यांचे खाणेपिणे सोबत होऊ लागले. ४ जुलै २०२० ला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या तरुणीच्या फ्लॅटवर त्यांनी पार्टी केली. या पार्टीनंतर तरुणी आणि भिमटेने शरीरसंबंध प्रस्थापित केले. नशा उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने तिला आपण लग्न करू, असे म्हटले. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. महिनाभरापूर्वी त्यांच्या संबंधातील गोडवा संपला. वाद होऊ लागल्यानंतर एकमेकांवर ते आरोप करू लागले. या पार्श्वभूमीवर, तरुणी सोमवारी (दि. ३) गणेशपेठ पोलिसांकडे पोहोचली. तिने भिमटेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली. त्यावरून गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

ब्लॅकमेलिंगचा आरोप

महिनाभरापूर्वी भिमटे पोलिसांकडे पोहोचला होता. त्यावेळी त्याने तरुणी ब्लॅकमेल करीत असल्याची कैफियत मांडली होती. मात्र तसे लेखी तक्रार देण्यास टाळाटाळ केली होती.

---

Web Title: Refuse marriage by establishing sexual relations