गॅस सिलेंडर वितरकांना आरोपमुक्त करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST2021-01-22T04:09:18+5:302021-01-22T04:09:18+5:30
नागपूर : चंद्रपूर येथील खांडरे ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या तीन भागीदारांनी गॅस सिलेंडर काळाबाजार प्रकरणातून आरोपमुक्त होण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई ...

गॅस सिलेंडर वितरकांना आरोपमुक्त करण्यास नकार
नागपूर : चंद्रपूर येथील खांडरे ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या तीन भागीदारांनी गॅस सिलेंडर काळाबाजार प्रकरणातून आरोपमुक्त होण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती रोहित देव यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.
सागर विश्वनाथ खांडरे, विशाल सागर खांडरे व संध्या सागर खांडरे अशी भागीदारांची नावे आहेत. ते हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस सिलेंडरचे वितरक आहेत. काळाबाजाराची गुप्त माहिती मिळाल्यामुळे गडचांदूर पोलिसांनी आरोपी गोपाल मालपाणीच्या घरी छापा मारला असता १५१ व्यावसायिक व घरगुती गॅस सिलेंडर मिळून आले. त्यानंतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. मालपाणीच्या बयानानुसार त्याला खांडरे ट्रेडिंगकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत होता. परिणामी, खांडरे ट्रेडिंगच्या भागीदारांना प्रकरणात आरोपी करण्यात आले. भागीदारांची आरोपमुक्त करण्याची विनंती सुरुवातीला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने व त्यानंतर सत्र न्यायालयाने अमान्य केली. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना उच्च न्यायालयातही दणका बसला.