शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 11, 2024 18:38 IST

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्य सरकारची विनंती

नागपूर: दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा (५३) याच्यासह इतर पाच कथित नक्षलवाद्यांची निर्दोष सुटका करणाऱ्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ५ मार्च रोजी संबंधित निर्णय दिला. त्याविरुद्ध अपील करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तिद्वय भूषण गवई व संदीप मेहता यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम दर्शनी उच्च न्यायालयाचा निर्णय गुणवत्तापूर्ण असल्याचे सांगून या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. परंतु, या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी सरकारला अनुमती देण्यात आली.

इतर आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (२९), हेम केशवदत्ता मिश्रा (३८), प्रशांत राही नारायण सांगलीकर (६०), विजय नान तिरकी (३६) व पांडू पोरा नरोटे (२८) यांचा समावेश आहे. नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे निधन झाले आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही देहरादून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी या आरोपींना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेचे सदस्य असणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य इत्यादी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली होती. तसेच, सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला होता. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर झाले. या आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई करताना बंधनकारक तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. आरोपींविरुद्ध खटला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या मंजुऱ्या कायदेशीर नाहीत, असे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय