अभिनेता विजय राजविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:22+5:302021-09-25T04:09:22+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी प्रसिद्ध विनोदी अभिनेता विजय राज यांच्याविरुद्धचा विनयभंगाचा एफआयआर व संबंधित खटला ...

Refusal to drop charges against actor Vijay Raj | अभिनेता विजय राजविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार

अभिनेता विजय राजविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी प्रसिद्ध विनोदी अभिनेता विजय राज यांच्याविरुद्धचा विनयभंगाचा एफआयआर व संबंधित खटला रद्द करण्यास नकार दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाची ही भूमिका पाहता यासंदर्भातील अर्ज मागे घेण्याविषयी राज यांचे मत विचारण्याकरिता वरिष्ठ ॲड. अविनाश गुप्ता यांनी सोमवारपर्यंत वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर सोमवारी पुढील सुनावणी निश्चित केली. गेल्या नोव्हेंबरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी विजय राजसह इतर कलावंत व कर्मचारी गोंदिया येथे आले होते. दरम्यान, ते काही दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी राज यांनी एका सहकारी तरुणीची छेड काढली असा आरोप आहे. त्या तरुणीच्या तक्रारीवरून ३ नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील रामनगर पोलिसांनी राज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण करून १२ डिसेंबर रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी राज यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Refusal to drop charges against actor Vijay Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.