लालफितशाहीत अडले निर्देश
By Admin | Updated: January 26, 2015 00:53 IST2015-01-26T00:53:25+5:302015-01-26T00:53:25+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या(डीपीसी) बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे आली आहे.

लालफितशाहीत अडले निर्देश
डीपीसीची कार्यवाही संथ : प्रस्ताव फाईलमध्येच
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या(डीपीसी) बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे आली आहे.अंभोरा येथील बुद्ध विहारासाठी जागेचा प्रश्न असो किंवा खरडून गेलेल्या जमिन मोबदल्याचे वाटप असो, खावटी अनुदानाचा प्रश्न असो. यासंदर्भात यापूर्वीच्या सभेतील निर्देशांचे पालन झाले नसल्याने सदस्यांना नाराजी व्यक्त करावी लागली.