प्रशासनामुळे अडली परिचारिकांची भरती

By Admin | Updated: May 9, 2014 02:19 IST2014-05-09T02:19:28+5:302014-05-09T02:19:28+5:30

'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही नियुक्ती ..

Recruitment of stuttered staff due to administration | प्रशासनामुळे अडली परिचारिकांची भरती

प्रशासनामुळे अडली परिचारिकांची भरती

नागपूर : 'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही नियुक्ती प्रक्रियाच थांबविण्याची शिफारस केली आहे. संबंधित हेल्थ पोस्ट'मधील डॉक्टर आणि परिचारिकांचे वेतन देण्यास केंद्र सरकार तयार होते. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक भरती अडकवून ठेवण्यात आली. या प्रकरणात थेट आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश तोतवानी यांनी पत्रपरिषदेद्वारा केली आहे.
तोतवानी यांनी सांगितले की, हेल्थ पोस्टसाठी १५ पैकी १२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन जागा आरक्षित असल्याने ती पदे भरण्यात आलेली नाही. परिचारिकांची नियुक्ती होऊ न शकल्याने डॉक्टरांचे वेतन महापालिकेलाच द्यावे लागत आहे. २00९ मध्ये हेल्थ पोस्टसाठी जाहिरात काढण्यात आली. मुलाखती झाल्या. १५ डॉक्टर, ६0 नर्स आणि १६ मिडवाईफ नर्सच्या नियुक्तीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. २0१0 मध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. परंतु परिचारिकांची नियुक्ती मात्र अडकली. परिचारिकांच्या नियुक्तीसाठी २२ एप्रिल २0१२ रोजी मनपा आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून त्यासंदर्भात सूचना मागविल्या. २५ मे २0१२ ला पत्र आले की परिचारिकांची भरती करता येऊ शकते.
२८ सप्टेंबर २0१२ ला मनपा सभागृहात प्रस्तावाला मंजुरी मिळाली. चार महिन्यानंतर अंमलबजावणी करण्याची तयारी झाली. मुलाखती व इतर प्रक्रियाही पार पडल्या. परंतु नियुक्ती मात्र झाली नाही. एक वर्ष उलटल्यानंतर मनपाने पुन्हा १२ मार्च २0१४ ला राज्य सरकारला पत्र पाठविले आणि केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Recruitment of stuttered staff due to administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.