Recruitment for 8500 posts in Mahapareshan | ऊर्जा विभागात होणार महाभरती; महापारेषणमध्ये ८५०० पदांवर भरती

ऊर्जा विभागात होणार महाभरती; महापारेषणमध्ये ८५०० पदांवर भरती


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतील ८५०० पदे भरण्याचे आदेश ऊजार्मंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिले. लोकमतने महापारेषणमधील रिक्त पदांसदर्भात वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल शासनाने घेतली, हे विशेष.

राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रित श्रेणीतील ८,५०० पदांची ही भरती लवकरच सुरु होईल. यात तांत्रिक संवगार्तील ६७५० पदे व अभियंता संवगार्तील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. ऊजार्मंत्र्यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत पदभरती करण्याचे आदेश दिले. नव्याने होण्यार्या या पदभरतीत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच अभियांत्रिकी पदवीधरांनाही संधी राहील. यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसाार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यासाठी नवीन मंजूर पदाचा आकृतीबंध सादरकरण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण
यंत्रचालक व तंत्रज्ञ संवगार्चे एकत्रीकरण करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Recruitment for 8500 posts in Mahapareshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.