शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डब्रेक : तोतलाडोह प्रकल्पात दोन दिवसात १८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:46 IST

तोतलाडोह या सर्वात मोठ्या प्रकल्पात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक १८ टक्के जलसाठा वाढला आहे. मंगळवारी प्रकल्पातील साठा ३० टक्क्यांवर पोहचला. काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्टला तोतलाडोहमधील जलसाठा शून्यावर होता, हे विशेष!

ठळक मुद्दे१८ दिवसात शून्यावरून साठा पोहचला ३० टक्क्यांवर

नत्थू घरजाळेलोकमत न्यूज नेटवर्करामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक उपविभागात असलेल्या तोतलाडोह या सर्वात मोठ्या प्रकल्पात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक १८ टक्के जलसाठा वाढला आहे. मंगळवारी प्रकल्पातील साठा ३० टक्क्यांवर पोहचला. काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्टला तोतलाडोहमधील जलसाठा शून्यावर होता, हे विशेष!मध्य प्रदेशातील चौरई (जि. छिंदवाडा) येथे पाणी रोखल्याने तोतलाडोह कोरडा पडला होता. परिस्थिती अशी होती की निम्म्याहून अधिक पावसाळा संपला तरी प्रकल्पातील मृतसाठा १५० दलाघमी होता. यामुळे सिंचन विभागापासून तर नागरिकांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंता पसरली होती. नागपूर महानगरपालिकेंतर्गत होणारा पाणीपुरवठा तोतलाडोह प्रक ल्पावर निर्भर आहे.१० ऑगस्टपासून तोतलाडोहमध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती. १५ ऑगस्टला चौरईचे दोन गेट उघडण्यात आले होते. त्यामुळे तोतलाडोहमधील साठा दोन टक्क्यांवर पोहचला होता. २३ ऑगस्टला गेट बंद होईपर्यंत हा साठा १२.२० टक्के झाला होता. २५ ऑगस्टच्या सायंकाळी ४ वाजता चौराईचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. २७ ऑगस्टच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत ४८ तासांत तोतलाडोहमधील साठ्यात १८ टक्के वाढ होऊन साठा ३० टक्क्यांवर पोहचला होता. पेंच सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांनी ही माहिती दिली.सिंचन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २८ ऑगस्टपर्यंत जलसाठ्यात पाच टक्के वाढ होऊ शकते. तोतलाडोहमध्ये साठा वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत तोतलाडोहमध्ये ४५ टक्के पाणी होते. मध्य प्रदेशात पडत असलेला पाऊस आणि चौरई प्रकल्पातील पाण्याचा साठा लक्षात घेता, परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी