गायत्रीनगर लीज प्रकरणावर पुनर्विचार करा
By Admin | Updated: September 2, 2014 01:15 IST2014-09-02T01:15:10+5:302014-09-02T01:15:10+5:30
गायत्रीनगर परिसरातील १० हजार चौ.फुटाच्या जागेची लीज नागपूर सुधार प्रन्यासर्फे नुकतीच ३० वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र मागील ३० वर्षांत जागेवर एकही कार्य झाले नसल्याने दिलेल्या

गायत्रीनगर लीज प्रकरणावर पुनर्विचार करा
विश्व हिंदू परिषदेची मागणी : छोटू भोयर यांना निवेदन
नागपूर : गायत्रीनगर परिसरातील १० हजार चौ.फुटाच्या जागेची लीज नागपूर सुधार प्रन्यासर्फे नुकतीच ३० वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र मागील ३० वर्षांत जागेवर एकही कार्य झाले नसल्याने दिलेल्या निर्णयावर नासुप्रने पुनर्विचार करावा, या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्यावतीने नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर यांना देण्यात आले. या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. भोयर यांनी दिले.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गायत्रीनगरमागील १० हजार चौरस फुटाची जागा एका धार्मिक समुदायाला १९८४ साली शैक्षणिक विकास कार्यासाठी देण्यात आली होती. २०१४ पर्यंत ३० वर्षे उलटूनही या जागेवर हेतूप्रमाणे कार्याची सुरु वात झाली नसल्यावरही नासुप्रने पुन्हा २०१४ साली त्यांच्या लीजचे नूतनीकरण केले. नासुप्रच्या या निर्णयामुळे परिसरातील दुसऱ्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, योग्य तो निर्णय घेऊन धार्मिक वातावरण चिघळणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष श्रीकांत आगलावे, बजरंग दलचे प्रांत सहसंयोजक किशोर दिकोंडवार, सहदेव गोसावी, राकेश कदम, सोमनाथ गोसावी, सुनील गोसावी, लकी गोसावी, मोहन दिकोंडवार, योगेश न्यायखोर, महेंद्र कठाणे, परसराम गोसावी, भय्या शरणागत, प्रशांत करोले, श्रेयस तांबेकर, शंकर अंकुशे, विक्की बेलखोडे. कमलेश मेश्राम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)