वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करची मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:22+5:302021-05-25T04:08:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात ऊर्जा विभागात हजारो कर्मचारी सेवा देत आहेत. घरे, कारखाने, रुग्णालय, रेल्वे यासारख्या ...

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करची मान्यता द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात ऊर्जा विभागात हजारो कर्मचारी सेवा देत आहेत. घरे, कारखाने, रुग्णालय, रेल्वे यासारख्या महत्त्वपूर्ण सेवा वीजपुरवठयावर अवलंबून आहेत. या सेवा पुरविण्यासाठी वीज कर्मचारी अव्याहतपणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना राज्य शासनाने फ्रंटलाईन वर्करचा दर्जा प्रदान करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
कोरोनामुळे वीजपुरवठ्याला जीवनावश्यक बाबीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्णालयांमध्ये आपल्या जिवाशी झुंज देत आहेत. तेथे निरंतर वीज पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम वीज कर्मचारी करत आहेत. जीवावर उदार होऊन ते हे काम करत असून, अनेकांना कोरोनाचा संसर्गदेखील झाला आहे. ही त्यांची सेवा लक्षात घेता, वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी व त्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.