शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST2021-06-20T04:08:04+5:302021-06-20T04:08:04+5:30
(निर्णयार्थ) नागपूर : शिवसेनेच्या ५५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्त पक्षातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून वृक्षारोपण करण्यात आले. महानगर प्रमुख ...

शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व वृक्षारोपण
(निर्णयार्थ)
नागपूर : शिवसेनेच्या ५५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्त पक्षातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून वृक्षारोपण करण्यात आले. महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पित केली. शिवसेना विभाग प्रमुख हरीश रामटेके यांच्यातर्फे पंचवटी वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना छत्री व फळ वितरित करण्यात आले. प्रभाग-२९ मध्ये वृक्षारोपण करून वृक्ष वितरित करण्यात आले. शहर प्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी, नगरसेविका मंगला गवरे, संघटक किशोर पराते, हितेश यादव, विक्रम राठोड, नितीन नायक, आशिष मानपिया, सुरेखा खोब्रागडे, सुशिला नायक, मुन्ना तिवारी, नाना झोडे, बंडू तळवेकर, ओम यादव, राम कुकडे, पुरुषोत्तम कांद्रीकर, संदीप पटेल, धीरज फंदी, शशीधर तिवारी, आशिष हाडके, अब्बास अली, विशाल कोरके, हरीश रामटेके, अंकुश भोवते, पंकज कुंभलकर, गजानन चकोले, रमेश काकडे, शिवशंकर मिश्रा, मुकेश रेवतकर आदी उपस्थित होते.