शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  शिक्षकांची कारणे आली अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 23:38 IST

निवडणुकीचे काम टाळण्यासाठी हिंगणा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. मोठ्या संख्येने शिक्षकांकडून आरोग्याच्या तक्रारी आल्यामुळे तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची गंभीरता लक्षात घेता, शिक्षकांचे आरोग्य जाणून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. या तपासणीत जर शिक्षक सृदृढ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे फर्मान निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे शिक्षकांची कारणे त्यांच्याच अंगलट आली.

ठळक मुद्देमेडिकली अनफिट दाखवून टाळले निवडणुकीचे काम : निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले कारवाईचे फर्मान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीचे काम टाळण्यासाठी हिंगणा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. मोठ्या संख्येने शिक्षकांकडून आरोग्याच्या तक्रारी आल्यामुळे तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची गंभीरता लक्षात घेता, शिक्षकांचे आरोग्य जाणून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. या तपासणीत जर शिक्षक सृदृढ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे फर्मान निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे शिक्षकांची कारणे त्यांच्याच अंगलट आली.हिंगणा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकात २२३ मतदान केंद्रावर होणार आहे. त्यासाठी १३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी शिक्षकांनाही ड्युटीवर लावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यात अनेक शिक्षक आले नव्हते. अनेक शिक्षकांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून निवडणुकीचे काम रद्द करण्यासाठी अर्ज केले. शिक्षकांची ही कारणे तालुका निवडणुक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना १५ सप्टेंबर रोजी एक पत्र पाठवून निर्देश दिले. यात सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यास तथ्य सामोर येईल. जर तपासणीत ते ठीक आढळले तर त्यांच्या विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे शिक्षकांमध्ये चांगलाच घबराट पसरली आहे. या पत्रात निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार करण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. तपासणीत जे शिक्षक सृदृढ आढळतील, त्या शिक्षकांवर निवडणूक आयोगाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी न्यायोचित कारवाई करण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे. शिक्षकांची यादी पाठविली विभागालाज्या शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे अर्ज दिले आहे, त्यांच्या अर्जासह शिक्षकांच्या नावाची यादी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविली आहे. ताबडतोब शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करून अभिप्राय पाठविण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTeacherशिक्षक