शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील वास्तव : तीन वर्षांत ८४ मनोरुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 8:15 PM

विविध कारण तसेच वादांमुळे चर्चेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मनोरुग्णालयात तब्बल ८४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत १८ मनोरुग्ण पळून गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

ठळक मुद्दे१८ रुग्णांचे पलायन 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध कारण तसेच वादांमुळे चर्चेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मनोरुग्णालयात तब्बल ८४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत १८ मनोरुग्ण पळून गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांबाबत विचारणा केली होती. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ पासून या मनोरुग्णालयात किती रुग्ण आले, किती रुग्णांवर उपचार झाले, रुग्णांचा मृत्यू, पळून गेलेले रुग्ण, इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ पर्यंत प्रादेशिक मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात ९७ हजार २२१ रुग्ण दाखल झाले, तर आंतररुग्ण विभागात २ हजार ५४५ रुग्ण दाखल झाले. यातील ८४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पुरुष व महिला रुग्णांचा समावेश आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत रुग्णांच्या औषधोपचारावर ८२ लाख ७ हजार ९५६ रुपयांचा निधी खर्च झाला.३५ टक्के पदे रिक्तप्रादेशिक मनोरुग्णालयात रिक्त पदेदेखील डोकेदुखी बनली आहेत. रुग्णालयात ३७४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी २४२ पदे भरली आहेत, तर १३२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३५ टक्क्यांहून अधिक आहे. गट ‘अ’मधील ४० टक्के, ‘ब’ गटातील ५० टक्के, ‘क’ गटातील २५ टक्के तर ‘ड’ गटातील ३९ टक्के पदे रिक्त आहेत.मृत्यू कसे झाले?दरम्यान, तीन वर्षांत ८४ मृत्यू झाले, हे प्रादेशिक मनोरुग्णालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या मृत्यूंचे कारण काय होते, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू नेमक्या कोणकोणत्या कारणांमुळे झाले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.वर्षनिहाय मृत्यूवर्ष           मृत्यू२०१६       ३०२०१७       २१२०१८       ३३

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयDeathमृत्यू