रेल्वेखंडात होणार रियल टाइम ट्रेन मॅनेजमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:09+5:302021-04-20T04:09:09+5:30
नागपूर : मुंबई ते विशाखापट्टणमपर्यंत ग्रीन कॅरिडोर बनवून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविली जाणार आहे. ही ट्रेन नागपुरातही येणार आहे. मध्य ...

रेल्वेखंडात होणार रियल टाइम ट्रेन मॅनेजमेंट
नागपूर : मुंबई ते विशाखापट्टणमपर्यंत ग्रीन कॅरिडोर बनवून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविली जाणार आहे. ही ट्रेन नागपुरातही येणार आहे. मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे अपर रेल्वे व्यवस्थापक अनूप कुमार सतपथी यांनी ही माहिती दिली.
नागपुरात ही ट्रेन आल्यावर येथे ऑपरेशनल हॉल्ट अंतर्गत चालक आणि गार्डची ड्युटी बदलली जाईल. रेल्वे खंडामध्ये या ट्रेनचे रियल टाइम मॅनेजमेंट केले जाईल. अर्थात, ही ट्रेन एखाद्या रेल्वे खंडात आल्यावर त्याच वेळी येणाऱ्या अन्य ट्रेन थांबवून या ऑक्सिजन एक्स्प्रेसला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला जाईल. सतपथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन आधी रिकामे टँकर घेऊन विशाखापट्टणमला जाईल. तेथून ऑक्सिजन भरलेले टँकर घेऊन परत येईल. ही ट्रेन नागपूर तसेच अन्य रेल्वे स्थानकावर किती टँकर उतरविणार आहे, हे अद्याप राज्य सरकारकडून स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी नागपूर रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून यासाठी रॅम्प तयार करून ठेवले आहेत.