शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या आरोपात फसवून खंडणी उकळणारे बंटी-बबली जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 12:38 IST

मेघालीने आतापावेतो वर्धा आणि एमआयडीसीतील एका उद्योजकासह एक डझनपेक्षा जास्त जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देस्वत:च शरीरसंबंधासाठी बाध्य करायचे, नंतर खंडणी उकळायचे

नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध प्रस्थापित करायचे आणि नंतर बलात्काराचा आरोप लावून खंडणी वसूल करायची, अशी कार्यपद्धती असलेल्या एका कुख्यात महिलेसह तिच्या साथीदाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली. मेघाली उर्फ भाविका (वय ३५) आणि मयूर राजू मोटघरे (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. बंटी-बबली नावाने ते कुख्यात आहेत.

तिच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र रमेशलाल वनवानी (वय ३२, रा. जरीपटका) असून, ते भाजीचा व्यवसाय करतात. अनेक दिवसांपासून मेघाली महेंद्रकडे भाजी घ्यायला जात होती. त्यामुळे त्यांच्यात ओळख आणि नंतर मैत्री झाली. पुढे भेटीगाठी वाढल्यानंतर मेघालीने महेंद्रला पतीच्या अत्याचारामुळे आपण एकटीच जुनी मंगळवारी, लकडगंजमध्ये भाड्याच्या घरात राहते, असे सांगून त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर महेंद्रसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, मेघालीकडे आरोपी मोटघरे नियमित यायचा. तो मावसभाऊ असल्याचे तिने महेंद्रला सांगितले होते. वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या महेंद्रच्या घरी १६ सप्टेंबर २०२१ ला ती धडकली. लग्न कर, अन्यथा तुला बलात्काराच्या आरोपात फसवेल, अशी धमकी तिने महेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यामुळे लग्न करून महेंद्र तिच्यासोबत राहू लागला. मात्र, आठच दिवसांत तिने त्याला कुटुंब सोडण्यास आणि भाड्याचे घर घेण्यास बाध्य केले. त्यानंतर एक दिवस अचानक महेंद्र घरी धडकला. त्यावेळी त्याला मेघाली आणि मोटघरे शरीरसंबंध जोडताना दिसले. त्यामुळे मेघालीसोबत महेंद्रचे कडाक्याचे भांडण झाले आणि महेंद्रने तिच्याशी नाते तोडले.

त्यानंतर मेघालीने महेंद्रविरुद्ध बलात्कार करून छळ करण्याच्या आरोपाखाली जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या कुटुंबीयांवरही छळाचा आरोप लावला. पोलिसांनी महेंद्रला अटक करून कारागृहात डांबले. त्यानंतर मेघाली अधिकच आक्रमक झाली. कारागृहात भेटून महेंद्रला पैशांची मागणी केली. नाही दिल्यास तुझी आणि नातेवाइकांची जमानत होऊ देणार नाही, तुझा मर्डर करेन, अशीही धमकी देत महेंद्रकडून २.१० लाख रुपये हडपले.

हनीट्रॅपचा खुलासा

मेघालीने आतापावेतो वर्धा आणि एमआयडीसीतील एका उद्योजकासह एक डझनपेक्षा जास्त जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. ज्यांनी तिला खंडणीची भीक घातली नाही, अशांविरुद्ध तिने मोटघरेच्या मदतीने वर्धा, नंदनवन, लकडगंज, बुटीबोरी, एमआयडीसी आणि जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवून त्यांना बलात्काराच्या आरोपात अडकवले. आता मात्र तीच पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने पुन्हा काही खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅपnagpurनागपूरPoliceपोलिस