बौद्ध संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती

By Admin | Updated: January 26, 2015 00:54 IST2015-01-26T00:54:50+5:302015-01-26T00:54:50+5:30

तथागत गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारलेली समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्यावर आधारलेली संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती असून जगभरात याच भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो.

This is the real Indian culture of Buddhist culture | बौद्ध संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती

बौद्ध संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती

बुद्ध महोत्सवाचा समारोप : हनुमंत उपरे यांचे प्रतिपादन
नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारलेली समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्यावर आधारलेली संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती असून जगभरात याच भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो. परंतु बौद्ध संस्कृतीचे विकृतीकरण करून त्याद्वारे अनेक वर्षांपासून सांस्कृतिक दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी येथे केले.
त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवाचा रविवारी समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. धम्मचारी लोकमित्र, धम्मचारी अमोघसिद्धी, डॉ. सरोज आगलावे, राजाभाऊ टांकसाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, डॉ. त्रिलोक हजारे आदी व्यासपीठावर होते.
हनुमंत उपरे म्हणाले, जात ही मानवात नसून जनावरांमध्ये असते. परंतु मानवात जाती निर्माण करण्यात आल्या. निसर्गातील डोंगर आमचे प्रतीक होते. परंतु त्या डोेगरातील दगड आणून त्याला देव बनवण्यात आले आणि त्यातून सांस्कृतिक भीती निर्माण करण्यात आली असून ती आजही सुरू आहे.
आमच्या अज्ञानावर ही जातीप्रथा टिकली असून ती नष्ट करणे आपल्याच हाती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुनील तलवारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
एक हजार विद्यार्थ्यांनी सादर केले मैत्रीगीत
बुद्ध महोत्सवाचा समारोपाचे विशेष आकर्षण ठरले ते शाळकरी मुलांच्या सामूहिक मैत्रीगीताचे सादरीकरण. नागपुरातील विविध शाळांमधून आलेल्या तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी मैत्रीगीत सादर केले.

Web Title: This is the real Indian culture of Buddhist culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.