शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दंड भरू, पण खड्डे, गतिरोधक, मोकाट जनावरे यांचे काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:54 AM

नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन नव्या कायद्याबाबत सरकारची भूमिका व तडजोड शुल्क याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घ्यावा, अशी मागणी जनमंचने एका पत्रकातून केली आहे.

ठळक मुद्देजनमंचने वेधले लक्षनवीन मोटार वाहन कायद्याबाबतची भूमिका आचारसंहितेपूर्वी स्पष्ट करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची रक्कम दहा पटीने वाढविण्यात आली आहे. कायदे कडक असणे हे जरी आवश्यक असले तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली आहे. यामुळे याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन नव्या कायद्याबाबत सरकारची भूमिका व तडजोड शुल्क याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घ्यावा, अशी मागणी जनमंचने एका पत्रकातून केली आहे.जनमंचने म्हटले आहे की, अनेक राज्यसरकाने नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदी लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्मेट किंवा सिटबेल्ट न घालणे या सारख्या छोट्या गोष्टींसाठी प्रचंड दंडात्मक तरतुदी या कायद्यान्वये करण्यात आलेल्या आहेत. परंतु रस्त्यावरील खड्डे, चुकीच्या पद्धतीने बांधलेले गतिरोधक, रस्त्यांवरील मोकाट जनावरे, रस्त्यावर बंद अवस्थेत असलेली वाहने, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विद्युत व टेलिफोन खांब तसेच बंद असलेले पथदिवे यामुळे कित्येक निरपराध नागरिकांचे रोज बळी जात आहेत. मात्र यासाठी जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही. आॅटोरिक्षा मीटरने चालण्यास तयार नाही. यांच्यावर वाहतूक पोलीस व आरटीओची कारवाई का होत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. नो पार्किंसाठी मोठ्या दंडाची तरतूद केली जाते, परंतु पार्किंगच्या जागा उपलब्ध न करून देणाºया तसेच नो पार्किंग व पार्किंगचे बोर्ड न लावणाºया कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नव्या कायद्यात अपघातग्रस्तांना घेऊन चालकांचे हित जोपासले गेले की विमा कंपन्यांचे हित जोपासले जाणार आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय असल्याचे जनमंचने पत्रात नमुद केले आहे. शासनाने या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या पत्रातून जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, शरद पाटील, मनोहर रडके, मनोज चटप, राम आखरे, श्रीकांत दोड, टी.बी. जगताप, दादा झोडे यांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा