शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:00 IST

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीची अधिसूचना शुक्रवारीमतदारसंघनिहाय व्यवस्थेचा आढावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, निशिकांत सुके, शिरीष पांडे तसेच विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रासंदर्भात पूर्वसूचना देण्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची सुविधा विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात यावी. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होत असून, नामनिर्देशनपत्र ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. छाननी ५ ऑक्टोबर रोजी होईल. त्यांनतर ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकीद्वारे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर