गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा
By Admin | Updated: October 3, 2014 02:50 IST2014-10-03T02:50:56+5:302014-10-03T02:50:56+5:30
आज देशाला महात्मा गांधीच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या युवकांपर्यंत त्यांचे विचार पोहचल्यास, विकसनशील भारत साकार होईल.

गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा
नागपूर : आज देशाला महात्मा गांधीच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या युवकांपर्यंत त्यांचे विचार पोहचल्यास, विकसनशील भारत साकार होईल. त्यासाठी महात्मा गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार अविनाश पांडे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
चितारओळ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद उपस्थित होते. अनिस अहमद यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला सुरुवात केली.
पदयात्रेत खा. अविनाश पांडे, संतोष अग्रवाल, संजय खुळे, भागीरथ मुरारका, जयप्रकाश पारेख आदी उपस्थित होते. ही पदयात्रा इतवारी टांगा स्टॅण्ड, निकालस मंदिर, इतवारीतील शहीद चौकात पोहचली. शहीद चौकातील विदर्भ चंडिका देवीला अनिस अहमद यांनी पुष्पमाला अर्पण करून आशीर्वाद घेतले. यानंतर भालदारपुरा, धारस्कर रोड, भंडारा रोड, तीन नल चौक या परिसरातून पदयात्रा मार्गक्रमण करीत असताना, अहमद यांनी लोकांशी संपर्क साधला. परिसरातील महिला, व्यापारी, युवकांशी भेटीगाठी घेतल्या. पदयात्रेत रवि पैगवार, कमलेश समर्थ, अतुल कोटेचा, योगेश तिवारी, संतोष अग्रवाल, शांतीलाल गांधी, डॉ. रिया जैन, विश्वजित भगत, यशवंत कुंभलकर, यशश्री नंदनवार, लालचंद नाहाटा, अमृत भिसीकर, मनोहर विसपुते, रिंकु जैन, महेश कुकरेजा, सतीश पेंढारी, शरद गुप्ता, प्रमोद शुक्ला, मंगेश पाठराबे, दीनानाथ खरबीकर, संजय बिंड, अनिल सुने, रितेश सोनी, बाबा रंभाड, हसमुख सागलानी, संदीप कुंभारे, प्रभाकर खापरे, कुमार डागा, मुकेश शहा, कल्पना फुलबांधे, बाबू पुरोहित, दिनेश पारेख, अशोक मिरासे, बिट्टू गंगवानी, राजेंद्र हरडे, सुलभा नागपूरकर, संजय दुधे, राजेंद्र चांडक, राजू जैन, राजू वानखेडे, राजू चांदपूरकर, शेखर पौनीकर, दिनेश शाहा, विमल कोचर, पारस खिंची, विजय धाडीवाल, कुमार डागा, मनीष धाडीवाल, पुष्पा निमजे, रेखा बुरडकर, राजन कुंभारे, दिलीप पराते, अश्विन जवेरी, नितीन जैन आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)