पुन्हा सेसचा भार
By Admin | Updated: March 5, 2015 01:49 IST2015-03-05T01:49:35+5:302015-03-05T01:49:35+5:30
यापूर्वी रद्द करण्यात आलेला सेस (कर) पुन्हा आकारण्यात आल्याने

पुन्हा सेसचा भार
पेट्रोल, डिझेल महागले : सर्वसामान्यांना फटका
कमल शर्मा ल्ल नागपूर
यापूर्वी रद्द करण्यात आलेला सेस (कर) पुन्हा आकारण्यात आल्याने उपराजधानीतील पेट्रोल आणि डिझेल राज्यात सर्वात महाग झाले आहे. नागपूरकरांना आता पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे एक ते तीन टक्के अधिक दर द्यावे लागणार आहे.
शहरातील रस्ते बांधकामावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सेस लावण्यात आला असून, तो २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत वसूल केला जाणार आहे, असे विक्रीकर आयुक्त जी.बी. इंदूरकर यांनी स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलवर सेसची आकारणी प्रथमच होत नाही. त्याचा संबंध २००२ च्या एकात्मिक रस्ते विकास योजनेतून बांधण्यात आलेल्या रस्त्यांशी आहे. या रस्त्यांवर शासनाने ३५० कोटी रुपये खर्च केले होते.
असे आहेत नवीन दर
सोमवारी रात्री १२ वा.पासून उपराजधानीतील पंपावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आता पेट्रोल ७०.३५ आणि डिझेल ६०.५७ रुपये प्रति लिटर या दरात मिळेल. ही दरवाढ महापालिकेच्या हद्दीतील ६० पंपांवर लागू असेल. हद्दीबाहेरील पंपांवर जुन्याच दराने पेट्रोल-डिझेलची विक्री सुरू आहे.