Re-extension for filling up of Class XII examination forms | बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : २०२१ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता नियमित विद्यार्थ्यांना २८ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर २९ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. मंडळाने १५ डिसेंबरपासून परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. ४ जानेवारीपर्यंत अखेरची तिथी होती. त्यानंतर पुन्हा १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेली. आतापून्हा २८ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

Web Title: Re-extension for filling up of Class XII examination forms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.