आणखी १८ अभ्यासक्रमांची फेरपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:42+5:302021-09-03T04:08:42+5:30

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. ...

Re-examination of 18 more courses | आणखी १८ अभ्यासक्रमांची फेरपरीक्षा

आणखी १८ अभ्यासक्रमांची फेरपरीक्षा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यापीठाने आणखी १८ अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीएस्सी,बीकॉम, बीसीए द्वितीय सत्रासह विविध अभ्यासक्रमांतील काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांचा फटका बसला होता. अनेकांना पेपर देता आले नाही तर काही जणांचे पेपर आपोआप सबमिट झाले. अखेर यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. यानुसार ५ ते ६ सप्टेंबर या कालावधीत विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील. यात बीएस्सी, बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीसीए, बीएस्सी (आयटी), बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बी.ए., बी.ए. (आर.एस.), बी.एफ.ए., बी.एस.डब्लू., बीएफडी, बीजेडी, बीआयडी, बीसीटी या अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांचा समावेश आहे. अडथळे आलेल्या विद्यार्थ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांत तक्रार द्यायची असून, प्राचार्यांना ऑनलाइन माध्यमातून विद्यापीठाकडे त्या सादर करायच्या आहेत.

परीक्षा - दिनांक

बीएस्सी, बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (आयटी), बीसीए - द्वितीय सत्र : ५ व ६ सप्टेंबर

बीकॉम, बीबीए, बीसीसीए (द्वितीय सत्र) : ५ व ६ सप्टेंबर

बी.ए., बी.ए. (आर.एस.), बी.एफ.ए., बी.एस.डब्लू. (द्वितीय सत्र), बीए (जनसंवाद) भाग १ व भाग २ - ५ व ६ सप्टेंबर

बीएफडी, बीआयडी, बीजेडी, बीसीटी (द्वितीय सत्र) - ५ व ६ सप्टेंबर

.

Web Title: Re-examination of 18 more courses