२३ सप्टेंबरला एम.ए.च्या ११० विषयांची फेरपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:12 IST2021-09-17T04:12:24+5:302021-09-17T04:12:24+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे एम.ए.च्या द्वितीय सत्र अभ्यासक्रमांच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे ...

२३ सप्टेंबरला एम.ए.च्या ११० विषयांची फेरपरीक्षा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे एम.ए.च्या द्वितीय सत्र अभ्यासक्रमांच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना अगोदर परीक्षा देता आली नव्हती किंवा उत्तरपत्रिका सबमिट करताना अडथळे आले होते असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे. २३ सप्टेंबर रोजी ११० विषयांची परीक्षा होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले आहे.
ऑनलाईन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यापीठाने एम.ए.च्या शंभराहून अधिक विषयांच्या फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अडथळे आलेल्या विद्यार्थ्यांनी २० सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांत तक्रार द्यायची असून, प्राचार्यांना ऑनलाईन माध्यमातून विद्यापीठाकडे त्या सादर करायच्या आहेत.