खिशात नाही मोबाईलमध्ये राहणार आरसी बुक, वाहन परवाना!
By Admin | Updated: September 12, 2016 21:38 IST2016-09-12T21:38:39+5:302016-09-12T21:38:39+5:30
वाहन चालविताना खिशात परवाना, आरसी बुक आणि विमा अशी कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक असते.

खिशात नाही मोबाईलमध्ये राहणार आरसी बुक, वाहन परवाना!
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १२ - वाहन चालविताना खिशात परवाना, आरसी बुक आणि विमा अशी कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक असते. नाहीतर नव्या नियमानुसार साडेतीन हजार रुपये दंड भरण्याची तयारी ठेवावी लागते. परंतु आता ही कागदपत्रे ‘डीजी-लॉकर’ या मोबाईल अॅपमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या संदर्भातील घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिल्ली येथी केली. यावर आता लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती, नवनियुक्त परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ‘लोकमत’ला दिली.
डॉ. गेडाम यांनी सोमवारी पहिल्यांदाच नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) भेट दिली. यावेळी पेपर आरसी बुकच्या तुटवड्याला घेऊन विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. डॉ. गेडाम म्हणाले, आरसी बुकचे स्मार्टकार्ड देणे बंद झाल्याने, विभागाच्यावतीने ‘प्री प्रिंटर स्टेशनरी’ उपलब्ध करून दिली जायची. परंतु याचाही तुटवडा पडल्याने आरसी बुक प्रलंबितांची संख्या वाढली होती.
याची दखल घेत प्रत्येक आरटीओ कार्यालयांना स्थानिक पातळीवर २५ हजार रुपयांपर्यंत ही स्टेशनरी विकत घेण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे. दरम्यानच्या काळात आरसी बुक स्मार्टकार्ड स्वरुपात देण्याच्या प्रक्रियेत वेग आला होता. परंतु याचवेळी ‘डीजी-लॉकर’ची घोषणा झाली. यामुळे आता ‘स्मार्टकार्ड’ की ‘डीजी-लॉकर’ यावर लवकरच निर्णय होणार आहे. परंतु तोपर्यंत कागदावर छापलेले आरसी बुक उपलब्ध करून दिले जाणार आहे.