शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशाच्या सणात उमजलेली आशेची किरणे ; प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनी तयार केल्या आकर्षक पणत्या

By सुमेध वाघमार | Updated: October 17, 2025 18:10 IST

Nagpur : वैद्यकीय उपचारांनी बरे झालेल्या रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'उडाण' प्रकल्पाने या दिवाळीत समाजासमोर एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी सादर केली आहे.

नागपूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, सृजनशीलतेचा सण. आणि याच दिवाळीत काही खास दिवे फक्त प्रकाशासाठी नव्हे, तर आशेचा नवा झगमगता किरण घेऊन आले आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयातील 'उडाण' प्रकल्पातून तयार झालेले हे दिवे बरे झालेल्या मनोरुग्णांच्या कलेचे सुंदर प्रतीक ठरले आहेत.

वैद्यकीय उपचारांनी बरे झालेल्या रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'उडाण' प्रकल्पाने या दिवाळीत समाजासमोर एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी सादर केली आहे. रुग्णांनी स्वत: रंगवलेल्या आणि सजवलेल्या सुमारे १७०० आकर्षक पणत्या या वर्षी तयार करण्यात आल्या असून, त्यापैकी ११३० पणत्यांची यशस्वी विक्रीही झाली आहे. विशेष म्हणजे काही पणत्या अमेरिकेपर्यंत पोहोचल्या, हे या उपक्रमाचे अनोखे यश आहे.

कलेतून साकारले आत्मभान

प्रादेशिक मनोरुग्णालयातील ‘उडाण’ प्रकल्पांतर्गत चालवले जाणारे डे-केअर केंद्र हे बºयाचशा रुग्णांसाठी नवजीवनाचे दार ठरत आहे. येथे शिवणकाम, झाडू, पत्रावळी, ज्वेलरी, शेती कौशल्य यांसह पणत्या सजावटीचे प्रशिक्षण दिले जाते. हे केवळ हसत-खेळत शिकवले जात नाही, तर रुग्णांच्या आत्मविश्वासातही भर घालते. ही पणत्या अ‍ॅक्रेलिक आणि आॅईल पेंटसह सजवून अगदी साध्या शैलीत, पण मनाला भिडणाºया सौंदर्याने रंगवल्या जातात.

समाजाच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल

या रुग्णांनी साकारलेल्या पणत्या केवळ एखाद्या कलाकृतीसारख्या नाहीत, तर त्या त्यांच्या जिद्दीची, उपचारांनंतरच्या प्रवासाची आणि पुन्हा उभे राहण्याच्या इच्छाशक्तीची ओळख आहे. समाजानेही या पणत्यांची दखल घेत, त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत यामध्ये आपला वाटा उचलला आहे. हे सामाजिक जाणिवेचे उदाहरण ठरते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमने यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक उपचार तज्ज्ञ डॉ. रीना खुरपुडी, ‘उडाण’ प्रकल्प डे-केअर समन्वयक प्रिया सोनवणे तसेच सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्विरीत्या राबविण्यात आला आहे. 

पुनर्वसनाचा प्रकाशमय मार्ग 

"हा प्रकल्प केवळ व्यवसायोपयोगी शिक्षण देत नाही, तर या रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक ठोस पाऊल टाकतो आहे. मानसिक आजारातून बरे झाल्यावर अनेकांना सामाजिक स्वीकार, आर्थिक स्वावलंबनाची चिंता भेडसावत असते ‘उडाण’ प्रकल्प त्यावर विश्वासाने आणि संवेदनशीलतेने उत्तर देतो आहे."-डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय

English
हिंदी सारांश
Web Title : Hope Shines: Patients Craft Lamps at Mental Hospital for Diwali.

Web Summary : Patients at a regional mental hospital in Nagpur created and sold over 1700 decorative lamps for Diwali under the 'Udaan' project. This initiative helps rehabilitate patients by providing vocational training like lamp-making, boosting confidence, and fostering social inclusion. Some lamps even reached America, showcasing the project's success.
टॅग्स :nagpurनागपूरMental Health Tipsमानसिक आरोग्य